दहा दिवसांसाठी पुणे, मुंबई राहणार पूर्णपणे बंद...? वाचा काय आहे सत्य...


वेब टीम : मुंबई
मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवार पासून १० दिवसांसाठी पूर्णत: लष्कराच्या लॉकडाऊनमध्ये असणार अशी सावध करणारी एक बातमी सध्या व्हॉटसएप ग्रुप्समध्ये फिरते आहे. 

यात महाराष्ट्र सरकारची एक बैठक सध्या सुरु असून कोणत्याही क्षणी पूर्णपणे बंदचा निर्णय घेतला जाईल असे या पोस्टमध्ये म्हणले आहे. 

सदरहू पोस्ट पूर्णपणे खोडसाळ असून अफवा पसरविण्याच्या उद्देशाने ती टाकली आहे असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

सरकारने दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर हा प्रकार पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

त्यामुळे नागरिकांनी यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post