अनेकांनी लाखो करोडो रुपयांचे पॅकेज जाहीर केलं, मात्र काहीच उपयोग झाला नाही...


वेब टीम : मुंबई
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवरही निशाणा साधला.

तुम्ही कितीही राजकारण केले तरी आम्ही राजकारण करणार नाही. आमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे.

तुम्ही कितीही ओरडलात तरी आम्ही प्रामाणिकपणे काम करत राहू, असे ठाकरे म्हणाले.

विरोधकांनी महाराष्ट्र बचाओ आंदोलन करत राज्य सरकारला धारेवर धरले होते. यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले.

ते म्हणाले की, ही वेळ राजकारणाची नाही. वेळ मानवता धर्म पाळण्याची आहे. त्यामुळे तुम्ही कितीही ओरडलात तरी आम्ही काम करत राहू.

आमच्याकडून कोणतेही राजकारण होणार नाही, कारण आम्हाला अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्या पार पाडायच्या आहेत.

केंद्राकडून काही मदत मिळत आहे. मात्र अजूनही रेल्वेच्या तिकिटाचे पैसे, GSTचा परतावा अनेक गोष्टी मिळाल्या नाही.

तरीही आम्ही आरडाओरडा करत नाही

तसेच आर्थिक पॅॅकेजबाबतही उद्धव ठाकरे म्हणाले की. आर्थिक पॅॅकेज दिले नाही असे विरोधक म्हणत आहेत.

मात्र आधी राज्यावर आलेले संकट आपण टाळू. हे संकट गेल्यानंतर आर्थिक पॅॅकेजचं बघू. अनेकांनी लाखो करोडो रुपयांचे पॅॅकेज जाहीर केले.

मात्र काहीच उपयोग झाला नाही. आम्ही कुठेही जाहिरातबाजी करत नाही. आमची कामं सुरूच आहेत.

आतापर्यंत 481 ट्रेन राज्यातून परराज्यात सोडल्या आहेत. तर आतापर्यंत 6 ते 7 लाख घरी गेली आहेत.यासाठी 85 कोटी रुपये दिले.

तसेच एसटीच्या माध्यमातून आज 3 लाखजणांना घरी पोहचवल आहे. यासाठी 75 कोटी खर्च केला. आता अजून कोणते पॅॅकेज हवे आहे.

आज शिवथाळीच्या माध्यमातून लाखो लोक 5 रुपयात जेवत आहेत. अनेक ठिकाणी मोफत उपचार दिले जात आहेत. हे देखील पॅॅकेज आहे.

महाविकास आघडीचे सरकार हे केवळ पोकळ आश्वासन देत नाही. तर ते जाहिरातबाजी न करता प्रत्यक्ष काम करत आहे, असा टोलाही ठाकरेंनी विरोधकांना लगावला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post