राज्यातील खासगी शाळांना शिक्षणमंत्र्यांनी दिला इशारा... म्हणाल्या...


वेब टीम : हिंगोली
खासगी शाळांनी जादा शुल्क आकारल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला.

जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्या बोलत होत्या.

ज्या खाजगी शाळा पालकांकडून ज्यादा शुल्क आकारतील अशा शाळांवरती कार्यवाही करू.

त्याचबरोबर दरवर्षी शैक्षणिक वर्ष १५  जूनला होते. याही वर्षी १५ जूनलाच शाळा सुरू करण्याचा मानस आहे.

परंतु, सध्याची परिस्थिती पाहता यावर पुढील निर्णय घेणार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

त्याचबरोबर खासगी शाळांनी शुल्क वाढवू नये, पालकांना सोयीचे पडेल तशा पद्धतीने टप्प्यांमध्ये शाळांनी पालकाकडून शुल्क घ्यावे, अशी सूचना देखील त्यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post