सावधान... व्हिटॅमिन 'डी' असलेली औषधे घेताय... अतिरिक्त सेवनाने होऊ शकतो....


वेब टीम : लंडन
सद्य:स्थितीत 'व्हिटॅमिन डी'पूरक औषधांमुळे प्राणघातक कोरोना बरा होत असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध नाहीत.

त्यामुळे 'व्हिटॅमिन डी'च्या औषधाचे अतिरिक्त सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते,

असा इशारा ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी यासंबंधीच्या अभ्यासातून दिला आहे.

व्हिटॅमिन डी पूरक औषधामुळे कोरोनाचा धोका कमी होत असल्याचे किंवा त्यामुळे कोरोना बरा होत असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

जोपर्यंत याचे ठोस वैज्ञानिक पुरावे हाती येत नाहीत, तोपर्यंत डी-जीवनसत्व पूरक औषधाचा वापर न करण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

शरिरातील डी -जीवनसत्वाचा पुरेसा स्तर आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी खूप आहे.

पण त्यामध्ये गोळ्या घेऊन वाढ करण्यात आली, तर त्याचा विपरित परिणाम आरोग्यावर पडू शकतो.

प्रामुख्याने रक्तातील कॅल्शियमच्या पातळीत वाढ होणे जास्त हानीकारक ठरू शकते, असा इशारा सरे विद्यापीठातील संशोधनाच्या प्रमुख लेखक सुए लान्हाम-न्यू यांनी दिला आहे.

त्याचबरोबर संशोधकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्या जाणाऱ्या व्हिटॅमिन डी औषधाच्या अतिरिक्त सेवनावर चिंता व्यक्त केली आहे.

सद्य:स्थितीत व्हिटॅमिन डी पूरक औषध व श्वसन संसर्गाविरुद्घ प्रतिकार यांच्यात कोणताही पक्का दुवा नसल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

प्रामुख्याने आपल्याला सूर्यप्रकाशापासून ड-जीवनसत्व मिळते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post