अर्शद वारसीने केले उद्धव ठाकरेंचे कौतुक... म्हणाला, 'अशी परिस्थिती दुसऱ्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांवर आली नसेल'


वेब टीम : मुंबई
राज्यात कोरोनाशी युद्ध लढताना संयमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.

कोरोनाचे संकट कायम असताना महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचे सावट आहे .

यापार्श्वभूमीवर अभिनेता अर्षद वारसीनं एक ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केले आहे.

‘मला वाटत नाही की अशी परिस्थिती दुसऱ्या कुठल्या मुख्यमंत्र्यांवर आली असेल’, असे अर्षद वारसी म्हणाला आहे.

आपल्या ट्विटमध्ये अर्षद वारसी म्हणाला की , ‘मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये इतकी सारी आव्हानं पाहिली असतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसलेच होते, तितक्यात त्यांना एका जागतिक महामारीने राज्यासमोर उभ्या केलेल्या संकटाचा सामना करावा लागला.

मुंबईसारख्या गर्दीच्या शहराला या संकटापासून वाचवण्याचं काम करावं लागलं.

आणि कोरोनाचं संकट अजूनही असताना आता निसर्ग चक्रीवादळाचं आव्हान त्यांच्यासमोर उभं ठाकले आहे’, असे अर्षद वारसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post