एमपीएससी परीक्षेबाबत महत्वाची घोषणा... वेळापत्रक जाहीर


वेब टीम : मुंबई
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थगित केलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे.

या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार आहे.

एमपीएससीकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना विषाणू संसर्गामुळे एमपीएससीने नियोजित परीक्षा स्थगितीचा निर्णय घेतला होता.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते.

त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षांचे काय असा प्रश्न राज्यभरातील उमेदवारांना पडला होता.

एमपीएससी स्टुडंट्स राईट्स, एमपीएससी समन्वय समिती यांच्यासह राज्यभरातील उमेदवारांकडूव परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता.

एमपीएससीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार आता वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार आहे, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post