मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; आजपासून देशभरात 'एक देश, एक रेशन कार्ड'


वेब टीम : दिल्ली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर आणि प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. 

एक जून २०२० पासून २० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेला सुरूवात झाली आहे. 

या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही रास्त भावाच्या दुकानातून त्याच्याकडे असलेल्या रेशन कार्डचा वापर करून अन्नधान्य घेता येणार आहे. 

या योजनेचा फायदा ६७ कोटी लोकांना फायदा होईल.

देशभरात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची चर्चा जोरदार रंगलेली असताना आता ‘एक देश, एक रेशन कार्ड’ मोहीम मोदी सरकारने सुरु केली आहे.

या मोहिमेचा कामगार, व दुर्बल घटकातील लोकांना फायदा होणार आहे. 

या कार्ड अंतर्गत देशातील कोणत्याही भागातून रेशन दुकानातून खाद्य सामान घेता येऊ शकणार आहे.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी डिसेंबर महिन्यात लोकसभेत याची माहिती दिली होती.

ही सुविधा ई-पीओएस मशीनवर बायोमॅट्रिक आधारवर अवलंबून आहे. 

रेशन कार्डसाठी सध्या १४ राज्यात पॉश मशीनची सुविधा सुरू केली आहे.

तसेच लवकरच २० राज्यात आणि केंद्र शासीत प्रदेशात ही सुविधा सुरू करणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post