शहीद जवानांच्या मुलांच्या मदतीला धावले 'सिद्धिविनायक'... शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार


वेब टीम : मुंबई
जम्मू काश्मीर खोऱ्यातील पुलवामा भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलं होतं.

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील पानगाव येथील सीआरपीएफचे जवान सुनील काळे यांना वीरमरण आले होते.

दरम्यान, त्यांच्या मुलाच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने घेतला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे एका दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान सीआरपीएफच्या हेड कॉन्स्टेबल सुनील काळे यांना वीरमरण आलं होतं.

२३ जून रोजी पहाटे लष्कर, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त मोहिमेत पुलवामा भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असताना तेथील बंडजू येथे दहशतवाद्यांशी चकमक उडाली.

यात सीआरपीएफ जवान सुनील काळे यांना वीरमरण आले. काळे हे सोलापूर जिल्ह्यातील पानगाव (ता. बार्शी) येथील मूळ राहणारे होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post