अहमदनगर : केडगाव, कोपरगावच्या दोघांना कोरोनाची बाधा...


वेब टीम : अहमदनगर
शहरातील केडगाव उपनगरात राहणारी 48 वर्षीय महिला तसेच कोपरगाव येथील एका 76 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली असल्याचे बुधवारी (दि.10) स्पष्ट झाले आहे.

हे दोघे बाधित व्यक्ती खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.

तेथे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर त्या दोघांनाही कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आले.

या संदर्भातील माहिती संबंधित खाजगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने जिल्हा रुग्णालयास कळविली आहे.

दरम्यान जिल्ह्यातील 20 रुग्ण कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन आज घरी परतले आहेत.

या व्यक्तींना वैद्यकीय तपासणीनंतर बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

यामध्ये अकोले 7, नगर महापालिका क्षेत्रातील 7, संगमनेर 4, राहाता 1 आणि श्रीगोंदा येथील 1 अशा 20 व्यक्तींचा समावेश आहे.

यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता 161 झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post