अहमदनगर : गंभीर गुन्ह्यातील शुक्ला टोळी जिल्ह्यातून हद्दपार


वेब टीम : अहमदनगर
लुटमार, हाणामारी, चोरी, दहशत पसरविणे अशा गुन्ह्यात गंभीर स्वरुपाचा गुन्हा करणार्‍या संजय शुक्ला टोळीतील तिघांना दोन वर्षाकरीता नगर जिल्ह्यातील बाहेर हद्दपार करण्यात आले.

टोळी प्रमुख संजय अदालतनाथ शुक्ला (वय 30), राहूल अदालतनाथ शुक्ला (वय 25), विनय अदालतनाथ शुक्ला (वय 23 सर्व रा.राजूर, जि.अ.नगर) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत.

अकोले तालुक्यात मारामारी, दहशत निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा करुन सरकारी नोकरास मारहाण, दारू विक्री, चोरी करणे अशा अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे करुन ही टोळी तालुक्यात दहशत माजवित आहे.

पोलिस अधीक्षक अखिलेशकुमारसिंह यांनी सदर हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर करुन या टोळीतील तिघांना अहमदनगर जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपूरी व ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दोन वर्षे हद्दपार करण्याची आदेश मंजूर केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post