कमाईतही अक्षय कुमारने मारली बाजी; जगातील टॉप १०० मध्ये समावेश...


वेब टीम : मुंबई
फोर्ब्जने जारी केलेल्या १०० सर्वाधिक मानधन असलेल्या जगभरातल्या कलाकरांमध्ये अक्षयकुमार या एकमेव भारतीय कलाकाराचा समावेश झाला आहे.

अक्षय ५२ व्या स्थानी अशून गेल्या वर्षात अक्षयने कमाई केली ती ४८.५ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ३६६ कोटी रुपये आहे.

या यादीमध्ये स्थान पटकावणारा अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे.

विशेष म्हणजे विल स्मिथ, जेनिफर लोपेझ यांनाही त्याने मागे टाकलं आहे.

गेल्या वर्षीच्या मिळकतीवरची ही यादी आहे.

या यादीत पहिल्या १० मध्ये रॉजर फेडरर, मेसी आहेत.

५९० मिलियन डॉलर्स कमाई करून केली जेनर पहिल्या स्थानावर आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे २०१९मध्ये देखील अक्षयने या यादीमध्ये स्थान मिळवले होते.

पण तेव्हा त्याची कमाई ६५ मिलियन डॉलर (सुमारे ४४४ कोटी रुपये) होती.

यंदा अक्षयच्या कमाईमध्ये घसरण झाल्याचे दिसत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post