लॉकडाऊन : अमेझॉनला ७ हजार ५०० कोटींचा तोटा...


वेब टीम : दिल्ली
करोनामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र यामुळे ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनला मोठा तोटा सहन करावा लागला आहे.

मार्च तिमाहित अॅमेझॉनचा नफा 29 टक्क्यांनी कमी होऊन तो 254 कोटी डॉलर्स इतका झाला आहे.

गेल्या वर्षी याच तिमाहित अॅमेझॉनला 356 कोटी डॉलर्सचा नफा झाला होता.

यावेळी त्यांना तब्बल 102 कोटी म्हणजेच अंदाजे 7 हजार 500 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

मार्च महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्येही पाच टक्क्यांची घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

गेले तीन महिने अनेक ठिकाणी लॉकडाउनमुळे लोकं आपल्या घरांमध्ये बंद आहेत.

या कालावधीत त्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदीही केली.

परंतु करोनामुळे कंपनीला आपल्या अन्य बाबींमध्ये म्हणजेच वस्तूंचा पॅकिंग, कर्मचार्‍यांची संख्या वाढवणे, त्यांना संरक्षण साहित्य पुरवणे आणि अधिक पैसे देणं यासर्वांमध्ये वाढ करावी लागली.

या सर्व बाबींमुळे खर्चात अतिरिक्त वाढ झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post