अहमदनगर : भाजपचे आमदार बसले उपोषणाला...


वेब टीम : अहमदनगर
कुकडीच्या पाणी प्रश्नावर माजीमंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांनी सोमवारी सकाळी (दि.१) श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. 

पाचपुते यांच्यासोबत भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, प्रा.तुकाराम दरेकर, गणपतराव काकडे, अनुजा गायकवाड, शहाजी खेतमाळीस, राजेंद्र उकांडे, अशोक खेंडके, बापूराव गोरे, भाऊसाहेब खेतमाळीस, पोपटराव खेतमाळीस उपोषणास बसले आहेत.पाचपुते उपोषणास बसल्याने भाजपाचे कार्यकर्ते श्रीगोंदा शहरात जमा होऊ लागले आहेत.

कुकडीचे आवर्तन ६ जूनपासून सोडणार असे कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंतराव धुमाळ यांनी जाहीर केले आहे. 

पण हे आवर्तन दि१ जूनपासून सुरु करणे आवश्यक होते.

कुकडीमधून शेतीसाठी तीन आवर्तने सोडता येतील अशी परिस्थिती होती. 

परंतु पुणे जिल्ह्याने तीन टीएमसी जादा पाणी वापरले. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. 

तिसरे आवर्तन पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे. ते ही उशीरा सोडण्यात येणार आहे. 

त्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर  मोठा अन्याय झाला आहे. असे आ.पाचपुते यांचे म्हणणे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post