हजारो नागरिकांची व्हाईट हाऊसच्या दिशेने चाल; ट्रम्प झाले भूमिगत


वेब टीम : वॉशिंग्टन
जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार सुरू आहे. 

अमेरिकेच्या वेगवेगळया भागांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरत चालले आहे. 

जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा सोमवारी मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. 

अधिकाऱ्याने जॉर्ज फ्लायड याला अटक करताना त्याची मान गुडघ्याने दाबून ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अमेरिकेत शुक्रवारपासून आंदोलनं सुरु आहेत.

जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत मोठ्या संख्येत हिंसक निदर्शने सुरू आहेत. 

शुक्रवारी रात्री व्हाइट हाऊसच्या दिशेने जाण्यासाठी हजारो निदर्शक जमले होते. 

यानंतर सुरक्षा म्हणून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाइट हाऊसच्या भूमिगत बंकरमध्ये नेण्यात आले. असे वृत्त न्यूयॉर्क दिले आहे.

सुमारे अर्धा तास डोनाल्ड ट्रम्प बंकरमध्ये होते. नंतर त्यांना पुन्हा वर आणले. 

हजारो निदर्शक व्हाइट हाऊसकडे येऊ लागल्यानंतर सिक्रेट सर्व्हिस आणि युनायटेड स्टेट्स पार्क पोलीस त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न करत होते. 

निदर्शक व्हाइट हाऊसच्या बाहेर एकत्र आल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची टीम आश्चर्य व्यक्त करत होती. 

यावेळी पत्नी मेलानिआ ट्रम्प आणि मुलगा बैरॉन ट्रम्प त्यांच्यासोबत होते की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post