पवारसाहेब राज्य सरकारला मार्गदर्शन करत असल्याचं दिसत नाही : चंद्रकांत पाटील


वेब टीम : पुणे
कोकणाच्या चक्रीवादळ दौऱ्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करत आरोप केले होते.

यानंतर दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

मात्र, रविवारी पुण्यात चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर स्तुतिसुमने उधळली आहे.

सरकारला सध्या पवारसाहेब मार्गदर्शन करतात, असं दिसून येत नाही. पवारांच्या कामाचा वेग भयंकर असून सर्व देशाने पाहिलं आहे.

आम्ही त्यांचा आदर ठेवूनच टीका करतो. या वयात कोकणात जाऊन त्यांनी दोन दिवस मुक्काम केला.

या वयातही ते तब्येतीची काळजी न करता समस्येला झडप मारतात.

अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांचं गुणगान केलं.

पुण्यात भाजपा नगरसेवक धीरज घाटेंनी वादळग्रस्त शेतकऱ्यांना घरांचं साहित्य पाठवलं.

या वाहनांना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मात्र, यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली.

कोकणात अजित पवार, जयंत पाटील गेले नाहीत.

मुख्यमंत्री केवळ एक ते दीड तास गेल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी चक्रीवादळानं शेतकरी, मच्छिमारांचं मोठं नुकसान झालं.

त्यामुळे प्रतिझाडाला किमान पाच वर्षाच्या उत्पन्नानुसार पैसे दिले पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली.

त्याचबरोबर सरकारनं पक्की घरं बांधून देता येतील का याबाबत विचार करावा, असं आवाहन केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post