राज्यभरात खासगी कार्यालये सुरु करण्यास राज्य सरकारची परवानगी...


वेब टीम : मुंबई
राज्यात पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्यात टप्याटप्याने आर्थिक व्यवहार सुरू होणार असल्याचे म्हटले होते.

राज्य सरकारने ३ जूनपासून लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला होता.

राज्यात आता लॉकडाऊन नाही ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू करत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली होती.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे.

यात राज्यातील खासगी कार्यालय ८ जून पासून पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

मात्र, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर १० टक्क्यांची मर्यादा असणार आहे.

सर्व खासगी कार्यालये क्षमतेच्या १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी (यापैकी जे जास्त असेल) यांच्यासह कामकाज सुरु करु शकतात.

 इतर कर्मचाऱ्यांना घरुन काम करावे लागेल.

यावेळी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम हाती घेईल.

जेणेकरुन कर्मचारी घरी परतल्यानंतर ज्यांना सहजपण लागण होऊ शकते त्यातही खासकरुन वृद्धांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेतील.

हा निर्णय ८ जून २०२० पासून लागू होईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post