--> धक्कादायक... कोरोनावर उपचार सापडले नसताना आता दुसऱ्या एका व्हायरसचा धुमाकूळ सुरु.. | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

धक्कादायक... कोरोनावर उपचार सापडले नसताना आता दुसऱ्या एका व्हायरसचा धुमाकूळ सुरु..

वेब टीम : लंडन एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे आता इबोला नामक व्हायरसने डोके वर काढले आहे. आफ्रिकेतील ...


वेब टीम : लंडन
एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे आता इबोला नामक व्हायरसने डोके वर काढले आहे.

आफ्रिकेतील काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकात इबोलाचा दुसरा प्रादुर्भाव झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे.

काँगोमध्ये ‘कोरोना’ संसर्गामुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे.

येथे संसर्गाची ३००० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर ७१ लोकांचा मृत्यूही झाला आहे.

काँगो आणि अनेक आफ्रिकन देशांमध्ये चाचणी किट आणि इतर आरोग्य सुविधांचा अभाव आहे.

अशा परिस्थितीत संक्रमणाच्या बाबतीत अचानक वाढ होण्याची नोंद येथे नोंदविली जाऊ शकते.

काँगोमध्ये खरसाचा प्रादुर्भाव देखील आहे.

जानेवारी २०१९पासून तीन लाख पन्नास हजार लोक खरसाने प्रभावित झाले आहेत,

तर ६५ हजारहून अधिक लोक मरण पावले आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हंटले आहे.


दरम्यान, आफ्रिकेतील काँगो देशात इबोलाचे सहा रुग्ण आढळले असून चौघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

एप्रिलमध्ये बेनी शहरात इबोलाच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता.

आता इबोला पश्चिम शहरातल्या माबंडाकापर्यंतही पसरला आहे.

दोन शहरांमध्ये सुमारे ६२० मैलांचे अंतर आहे. काँगोमधील इबोलाचा हा अकरावा उद्रेक आहे.

काँगोचे आरोग्यमंत्री इतेनी लाँगोंडो यांनी सांगितले, माबाडाकामध्ये इबोलाची नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

आम्ही तेथे लवकरच लस आणि औषधे पाठवणार आहोत.

काँगोच्या इक्वेतेर प्रांतात २०१८ मध्ये इबोलाचा उद्रेक झाला आणि ५४ घटना नोंदल्या गेल्या.

त्यामधील ३३ लोकांचा मृत्यू झाला.

काँगोमध्ये दोन नवीन लस वापरल्यानंतरही आतापर्यंत २२६० लोकांचा इबोला विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: धक्कादायक... कोरोनावर उपचार सापडले नसताना आता दुसऱ्या एका व्हायरसचा धुमाकूळ सुरु..
धक्कादायक... कोरोनावर उपचार सापडले नसताना आता दुसऱ्या एका व्हायरसचा धुमाकूळ सुरु..
https://1.bp.blogspot.com/-9YspQEdz1oU/XtdXoMO13sI/AAAAAAAAJT8/f9KJ8yl2QIo1na6EH5QxP1vu-gZDdhqMACLcBGAsYHQ/s640/congo-ebola-outbreak-spread.jpg
https://1.bp.blogspot.com/-9YspQEdz1oU/XtdXoMO13sI/AAAAAAAAJT8/f9KJ8yl2QIo1na6EH5QxP1vu-gZDdhqMACLcBGAsYHQ/s72-c/congo-ebola-outbreak-spread.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2020/06/congo-ebola-outbreak-spread.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2020/06/congo-ebola-outbreak-spread.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content