धक्कादायक : देशात २४ तासात वाढले दहा हजार कोरोनाबाधित रुग्ण...


वेब टीम : दिल्ली
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात अद्यापही दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे.

मागील चोवीस तासांत देशभरात आतापर्यंतचे सर्वाधिक असे ९ हजार ९७१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

तर २८७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता २ लाख ४६ हजार ६२८ वर पोहचली आहे.

यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले १ लाख २० हजार ४०६ रुग्ण, उपचारानंतर बरे झालेले व रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेले १ लाख १९ हजार २९३ जण व आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ६ हजार ९२९ जणांचा समावेश आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

जागतिक आकडेवारीनुसार  भारत हा आता जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या क्रमवारीत इटलीला मागे टाकत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

इटलीमधील रुग्णसंख्या २ लाख ३४ हजार ८१० आहे. युरोपातील देशांपैकी इटली आणि स्पेन हे देश सर्वाधिक प्रभावित झाले होते.

या क्रमवारीत आठवडय़ाभरापूर्वी भारत नवव्या स्थानावर होता.

कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनच्या रुग्णसंख्येपेक्षाही भारतातील रुग्णसंख्या अधिक आहे.

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये सहा लाख ७५ हजार को रोनाबाधित आहेत.

तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रशियामध्ये चार लाख ५८ हजार करोनाबाधित आहेत.

तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या दोन लाख ८८ हजार तर यूकेमध्ये दोन लाख ८४ हजार कोरोनाबाधित रूग्ण आहेत.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, अमेरिकामध्ये जगातील सर्वात जास्त कोरोनाबाधित आहेत.

१९ लाख ८८ हजार अमेरिकेतील नागरिकांना कोरोना व्हायरसने ग्रासले आहे. तर एक लाख १२ हजार जणांचा बळी घेतला आहे.

सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत अमेरिका जगात अव्वल स्थानावर असून भारत या यादीत सहाव्या स्थानावर आहे.

भारताच्या आधी या यादीत ब्राझील, रशिया, स्पेन आणि यूके या देशांचा समावेश आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post