भारताला डब्ल्यूएचओचा इशारा : कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढणार


वेब टीम : जिनिव्हा
‘अनलॉक’च्या निर्णयामुळे भारतात ‘कोरोना’बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य आपात्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मिशेल रेयान यांनी व्यक्त केली आहे.

भारतातील विविध भागात महासाथीच्या आजाराचा प्रभाव वेगवेगळा आहे.

तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील परिस्थितीत फरक आहे.

भारतात परिस्थिती अद्याप स्फोटक झाली नसल्याचे मिशेल रेयान यांनी सांगितले.

भारतात लॉकडाउनमुळे संसर्ग फैलावण्याचा वेग मंदावला आहे.

मात्र, त्यात आता शिथिलता देण्यात येणार असल्यामुळे ‘कोरोना’बाधितांची संख्या वाढण्याचा धोका आहे.

भारतात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर, शहरात लोकसंख्येची अधिक घनता असणे, हातावर पोट असणाऱ्यांना दररोज कामावर जाण्याशिवाय पर्याय नसणे आदी काही गोष्टींमुळे संसर्ग फैलावण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post