दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन...? निर्बंध वाढणार...


वेब टीम : दिल्ली
दिल्लीत कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

त्यामुळे राज्य सरकार मॉल, हॉटेल आणि प्रार्थन स्थळे खुली करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करु शकते.

महाराष्ट्रात अजूनही मॉल, हॉटेल आणि प्रार्थना स्थळे बंद आहेत.

पण दिल्लीमध्ये या गोष्टी सुरु झाल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा निर्बंध लागू करावे लागू शकतात.

 त्या दृष्टीने आम आदमी पक्षाचे सरकार आणि नायब राज्यपाल कार्यालयामध्ये विचारमंथन सुरु आहे. एका खासगी दैनिकाने या संदर्भात वृत्त दिले.

नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी काल सर्वपक्षीय बैठकीत वेगवेगळया पक्षाच्या प्रतिनिधींकडून मॉल, हॉटेल पुन्हा बंद करण्याचा निर्णय घ्यावा का?

यावर मते घेतली. नायब राज्यपाल कार्यालय आणि मुख्य सचिवांनी यावर कोणतेही मतप्रदर्शन केलेले नाही.

देशव्यापी लॉकडाउनमुळे ७५ दिवस बंद ठेवल्यानंतर दिल्ली सरकारने आठ जूनपासून शॉपिंग मॉल आणि हॉटेल उघडायला परवानगी दिली.

अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉक १.० अंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्बंध उठवण्याची परवानगी दिली आहे.

दिल्लीमध्ये मेट्रो आणि सिनेमा हॉल ३० जूनपर्यंत बंदच राहणार आहे.

“आपण देशव्यापी लॉकडाउन सुरु केले तेव्हा १०० प्रकरणे होती. आता ती हजारांमध्ये आहेत.

आपण पुन्हा लॉकडाऊन करण्यामध्ये काहीही अर्थ नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते.

आपल्याला विषाणू बरोबर जगणे शिकावे लागेल” असे दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post