गोपीनाथ मुंडेंना श्रद्धांजली वाहताना धनंजय मुंडे झाले भावुक... म्हणाले, अप्पा, मला बळ द्या...


वेब टीम : बीड
भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त निमित्त गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भावनिक ट्विट केले आहे.

‘अप्पा, आज तुमचा स्मृतिदिन. तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात.

तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजुर, कष्टकरी, वंचित – उपेक्षित दीन दुबळ्यांची सेवा करण्याची संधी मला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मिळाली,

त्यातून या गोरगरीब कष्टकऱ्यांचे आयुष्यमान प्रगती पथावर नेण्यासाठी काम करणार आहे.

त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, विकासासाठी मला बळ द्या अप्पा.’

अशा भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

तसेच त्यांनी एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला आहे.

तर, येणाऱ्या काळात या गोरगरीब – कष्टकरी, वंचित – उपेक्षित वर्गाच्या आयुष्यात थोडेफार जरी सकारात्मक बदल घडवणारे काम करता आले,

तर तीच माझी तुमच्यासाठी खरी श्रद्धांजली, नव्हे तर गुरुदक्षिणा ठरेल ! विनम्र अभिवादन. अस देखील धनंजय मुंडे म्हणाले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post