महागाईचा उडणार भडका; विनानुदानित गॅसच्या दरात वाढ


वेब टीम : दिल्ली
एकीकडे देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे महागाईचा भडका उडण्यास सुरुवात झाली आहे.

संपूर्ण देशभरात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. 

विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात साडेअकरा रुपये दरवाढ करण्यात आली आहे. 

१४.२ किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरची वाढीव दराने विक्री होणार आहे. 

सर्वसामान्य नागरिकांना विनाअनुदानित गॅससाठी ११.५० रुपये अधिक मोजावे लागतील, 

तर १९ किलोग्रॅम सिलेंडरची किंमत तब्बल ११० रुपयांनी वाढली आहे.

पुणे शहराची परिस्थिती पाहिल्यास पूर्वी विनाअनुदानित गॅस सिलेंडरचा दर ५८२ रुपये होता, आता तो ५९३.५० वर पोहचला आहे.

अहमदनगर शहरात ५९३ वरून ६०४.५० रुपयांवर गेला. 

तर १९ किलोग्रॅमचे सिलेंडर १०५५ वरून ११६५ रुपयांवर गेले आहे‌.

प्रत्येक शहरातील स्थानिक करपद्धती आणि वाहतूक यानुसार सिलेंडरची किंमत काही फरकाने कमी-अधिक असू शकते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post