मनुके खा... काही दिवसातच शरीरात दिसतील 'असे' बदल


वेब टीम : पुणे
मनुक्यांच्या नियमित सेवनाने थोड्याच दिवसात रस, रक्त, शुक्र इ. धातूंची तसेच ओजाची वृद्धी होते.

अधिक परिश्रम, कुपोषण, वृद्धावस्था अथवा एखाद्या मोठ्या आजारानंतर शरीर जेव्हा क्षीण होते,

तेव्हा त्वरित शक्ती मिळवण्यासाठी मनुका खूपच लाभदायी आहेत.

मनुक्यात लोह व सर्वच जीवनसत्वे मुबलक प्रमाणात आढळून येतात.

१०-१२ मनुका २०० मि.ली. पाण्यात भिजत ठेवा आणि दोन तासांनी खाऊन टाका.

रक्त शुद्ध होते संध्याकाळी १० ते १२ मनुका पाण्यात भिजू घाला.

सकाळी उठल्यानंतर मानुकातील बी काढून या मनुका चांगल्याप्रकारे चावून खाल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.

याशिवाय मनुका खाल्याने रक्त शुद्ध होते तसेच नाकातून येणारे रक्त थांबेल.

मनुकांचे सेवन २ ते ४ आठवडे करावे.

आयुष्य वाढवण्यात सहाय्यक वृद्धावस्थेत मनुक्यांचा प्रयोग केवळ आरोग्यरक्षणच करतो असे नाही तर आयुष्य वाढविण्यातही सहाय्यक असतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post