आमचे जवान ठार झाले पण भारतापेक्षा संख्या कमी...


वेब टीम : लडाख
पूर्व लडाखमध्ये भारतीय सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत आमचे सैनिक मारले गेलेत, असे आता चीनने कबूल केले आहे. पहिल्यांदाच चीनने आपले सैनिक ठार झाल्याचं मान्य केले आहे.

मात्र, मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या २० पेक्षा कमी आहे, असे म्हटले आहे. भारतीय जवानांनी चकमकीत ठार झालेल्या १६ जवानांचे शव चीनला सोपवले असे वृत्त आल्यानंतर चीनने ही कबुली दिली.

या चकमकीत २० जवान शहीद झाल्याचे भारताने जाहीर केल्यानंतरही चीन मात्र शांत होता. त्याच्या जखमी किंवा ठार झालेल्या जवानांची काहीही माहिती चीनकडून देण्यात आली नव्हती.

 आता मात्र पहिल्यांदाच चीनने अधिकृतपणे त्याचे जवान ठार झाल्याचं मान्य केले आहे.

याआधी ग्लोबल टाइम्सने ‘चिनी तज्ज्ञ’ या लेखात तणाव वाढू नये यासाठी चीन लडाखमधील जखमी तसेच ठार जवानांची आकडेवारी जाहीर करत नसल्याचे म्हटले होते.

चीनने २० पेक्षा कमी जवान ठार झाल्याचा आकडा जाहीर केला तर भारत सरकार पुन्हा दबावात येईल असे ट्विट ग्लोबल टाइम्सने केले होते.

चीनमधील काही विश्लेषक आणि निरीक्षकांनी, भारतीय अधिकारी भारतीयांना दिलासा देण्यासाठी चीनच्या जखमी तसेच ठार जवानांची संख्या भारतापेक्षा जास्त असल्याचे सांगत असल्याचा आरोप केला होता.

ग्लोबल टाइम्सने आपल्या रिपोर्टमध्ये माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांचाही उल्लेख केला आहे. शनिवारी सिंग यांनी चीनचे ४० पेक्षा जास्त जवान ठार झाल्याचे म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post