भारत-चीन दरम्यानचा तणाव होणार कमी... 'हा' महत्वाचा झाला निर्णय


वेब टीम : दिल्ली
पूर्व लडाखमधील गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर भारताने घेतलेल्या कणखर पवित्र्यापुढे अखेर चीनने नमते घेण्याची तयारी दर्शविली आहे.

प्रदीर्घ चर्चेनंतर दोन्ही देशांनी पूर्व लडाखमधून आपले सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली आहे.

त्यामुळे आगामी काळात उभय देशातील तणाव कमी होण्याची शक्यता आहे.

चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकार्‍यांमध्ये उच्चस्तरीय बैठक पार पडली.

सूत्रांच्या मते, ही चर्चा सकारात्मक झाली असून आगामी काळात दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासंदर्भातही एकमत झाले.

या बैठकीत गलवान खोर्‍यातील संघर्ष, तसेच अन्य वादांच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. लेफ्टनंट जनरल पदाचे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

याआधी, 6 जून रोजी देखील लेफ्टनंट जनरल पदावरील लष्करी अधिकार्‍यांमध्ये चर्चा झाली होती.

या बैठकीत सीमेजवळ उभारलेले तंबू हटवण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयानंतरही चिनी सैनिकांनी तंबू हटवले नव्हते.

15 जूनच्या रात्री उभय देशातील जवान एकमेकांना भिडले. चीनकडून दगड, लाठ्या आणि रॉडचा वापर झाला.

या संघर्षात भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. तर भारताच्या प्रत्युत्तरात चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले.

सुरूवातीस कोणतीही मनुष्यहानी झाली नाही म्हणणार्‍या चीनने नुकतेच काही सैन्य मारले गेल्याचे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post