वेब टीम : दिल्ली देशातील कोरोना रुग्णांची संख्या 2,07,615 इतकी झाली आहे. तर, बळींची संख्या 5815 वर पोहोचली आहे. रुग्णसंख्येचा सुरुव...
वेब टीम : दिल्ली
देशातील कोरोना रुग्णांची संख्या 2,07,615 इतकी झाली आहे.
तर, बळींची संख्या 5815 वर पोहोचली आहे.
रुग्णसंख्येचा सुरुवातीचा एक लाखांचा टप्पा 110 दिवसांत ओलांडला गेला.
तर, दुसरा टप्पा अवघ्या 15 दिवसांत ओलांडला गेला.
समाधानकारक बाब म्हणजे, देशात आतापर्यंत एक लाख रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 48.31 टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
मागच्या 24 तासांत 8,909 नवे रुग्ण समोर आले. तर, 217 जणांचा मृत्यू झाला.
मागच्या काही दिवसांपासून दररोज आठ हजारांहून अधिक रुग्ण समोर येत आहेत.
असे असले तरी अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे.
भारतातील मृत्यूदर 2.82 टक्के इतका आहे, तर जगभरात 6.13 इतका आहे.
प्रतिलाख लोकसंख्येमागे मृत्यूदर 0.41 टक्के आहे, तर जगात तो यापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे 4.9 टक्के आहे.
देशात कोरोनामुळे दगावलेल्या 73 टक्के लोकांना अन्यही आजार होते.
देशात वयोवृद्धांची संख्या 10 टक्के असून, कोरोनामुळे झालेल्या प्रत्येक दोन मृत्यूंमध्ये एक वयोवृद्ध आहे, अशी माहिती लव अगरवाल यांनी दिली.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउनचा पाचवा टप्पा लागू आहे.