महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी... काँग्रेसने बाहेर पडावे...


वेब टीम : मुंबई
शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकजूट होत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले .

मात्र आता महत्त्वाचे निर्णय घेताना काँग्रेसला विचारात न घेता शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री निर्णय घेत असल्याची खदखद काँग्रेस नेत्यांच्या मनात आहेत.

याच पार्श्वभूमीवर केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे.

महाराष्ट्रात तिघाडी सरकार मध्ये बिघाडी झाली आहे.

काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे.

मात्र काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी काँग्रेसने व्यक्त केली आहे.

 काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसेल तर त्यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढावा, असा सल्ला आठवले यांनी महाराष्ट्र काँग्रेसला दिला आहे.

रामदास आठवले यांनी ट्विट करून काँग्रेसला सल्लावजा आव्हान देत ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेत सरकारमधून बाहेर पडावे असे म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post