पंतप्रधान मोदी चीनबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत... उद्या होणार...


वेब टीम : दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान देशातील मुख्य राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करतील.

शुक्रवार 19 जूनला संध्याकाळी पाच वाजता बैठकीचं आयोजन केलं आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष बैठकीत सहभागी होतील.

पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करुन याविषयी माहिती दिली. चीनसोबतच्या तणावावर नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलेले नाही.

त्यामुळे बैठकीपूर्वी ते काही बोलणार का, याकडे देशाचे लक्ष आहे.

चीनच्या या भ्याड हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीतील हालचालींना वेग आला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला CDS प्रमुख बिपीन रावत, तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या प्रत्येक कुरापतीला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात संतापाची लाट उठली आहे.

चिनी सैन्यांकडून झालेल्या भेकड हल्ल्यात भारताचे अनेक जवान जखमीही झाले. त्यामुळे शहीदांची संख्या वाढण्याची भीतीही आहे.

दुसरीकडे या संघर्षात चीनचेही 43 सैनिक मृत किंवा जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post