अडचणीतील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार आले धावून; घेतला 'हा' मोठा निर्णय...


वेब टीम : दिल्ली
शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट दर मिळणार आहे.

मोदी सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला.

१४ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली.

पत्रपरिषदेत ही माहिती देताना कृषिमंत्री नरेंद्र तोमर म्हणाले की आता शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादन खर्चाच्या ५० ते ८३ टक्के जास्त दर मिळेल.

शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले की – कोरोना संकट काळातही शेतकऱ्यांनी धान्य पिकवले.

अडचणीच्या काळातही शेतकरी थांबला नाही.

शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदत वाढून देण्यात आली आहे.

या कर्जाची परतफेड ऑगस्टपर्यंत करता येईल.

आतापर्यंत ३६० लाख टन गहू, १६. ०७ लाख टन डाळींची खरेदी सरकारने केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post