मॉन्सून आला रे... महाराष्ट्रात दाखल... चार जिल्ह्यात सक्रिय...


वेब टीम : मुंबई
अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागांमध्ये मान्सून सक्रिय झाल्याचं वृत्त वेधशाळेकडून देण्यात आलं आहे.

मान्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हजेरी लावल्याची माहिती आहे.

सोलापूरच्या काही भागातही मान्सून धडकला आहे;

शिवाय ठाणे आणि कोकणातही अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे.

येत्या काही दिवसांमध्ये मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असल्यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये वरुणराजा दिमाखात हजेरी लावणार हे स्पष्ट होत आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून सक्रिय झाला असून

मान्सूनने गोवा आणि कोकण किनारपट्टी व्यापल्याची माहिती गोवा वेधशाळेकडून मिळाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post