कोरोना व्हायरस : मुंबईत ५० हजार रुग्ण...


वेब टीम : मुंबई
मुंबईने कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत मुंबईने चीनलाही मागे टाकले आहे.

शहरात आता ५० हजारांच्यावर कोरोनाचे रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महानगरपालिकेने कोरोना रुग्णांची वाढती संख्या असलेल्या भागात पालिकेने कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत.

मुंबईतील २४ विभागांत एकूण ७९८ कंटेन्मेंट झोन आहेत. यात १८९५७ कोरोना रुग्ण आढळले.

तर या झोनमधील ४५८८ इमारतींना सील केले आहे. तर, मुंबईतील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के नागरिक कंटेन्मेंट झोनमध्ये राहत आहेत.

महापालिकेने जाहीर केलेल्या आकडीवारीनुसार, या ७९८ कंटेन्मेंट झोनमध्ये ४२ लाख नागरिक राहतात.

तर, पालिकेने सील केलेल्या इमारतींमध्ये ८लाखांहून अधिक लोक राहतात.

या आकडेवारीनुसार, १.२५ कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत जवळपास ५० लाख नागरिक कंटेन्मेंट झोन व सील केलेल्या घरात राहत आहेत.

शहरात सध्या २९,००० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील ६५ टक्के रुग्ण हे झोपडपट्टी व चाळीतील आहे.

झोपडपट्टी व चाळीत कोरोनाचा प्रसार थांबवणे हे महानगरपालिकेसमोर आव्हान आहे.

पालिकेने तिथे ‘फिव्हर क्लिनिक सुरू केल्यामुळे जास्तीत जास्त कोरोनाच्या चाचण्या होत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post