आम्हाला डिवचलं तर आम्ही उत्तर देण्यास सक्षम : मोदींचा चीनला इशारा...


वेब टीम : दिल्ली
भारताला शांतता हवी आहे याबद्दल कोणालाही शंका असण्याचं कारण नाही. पण वेळ आल्यावर भारत उत्तर देण्यात सक्षम असल्याचं मोदींनी ठणकावून सांगितलं. तत्पूर्वी मोदींनी गलवान खोऱ्यातील संघर्षावर भाष्य करुन, शहिदांना आदरांजली वाहिली.

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी चिनी सैनिकांसोबत झालेल्या भारतीय सैनिकांच्या चकमकीचा उल्लेख करत भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं म्हटलं.

मोदी म्हणाले, “आपल्या देशावर जेव्हा जेव्हा संकटं आली आहेत, तेव्हा देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आपल्या सैनिकांनी शक्तीचं प्रदर्शन केलं आहे.

आपल्या क्षमतांना सिद्ध करुन दाखवलं आहे. त्याग आणि तितिक्षा आमच्या राजकीय चरित्राचा वाटा आहे.

विक्रम आणि वीरतामध्ये देखील देशाच्या चरित्राचा वाटा आहे. देशला विश्वास देऊ इच्छितो की, आपल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही.

आमच्यासाठी भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. त्याच्या रक्षणासाठी आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही.

याबाबत कुणालाही जराही भ्रम व्हायला नको. भारताला शांतता हवी आहे.

पण भारताला कोणी डिवचल्यावर कोणत्याही परिस्थितीत उत्तर देण्यासाठी भारत सक्षम आहे.

आमच्या दिवंगत शहीद वीर जवानांबाबत देशाला अभिमान आहे, असं म्हणत मोदी यांनी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post