पूर्णवेळ नाही तर अर्धवेळ तरी शाळा सुरु करा...

file photo

वेब टीम : अहमदनगर
साडेतीन महिन्यापासून शाळा बंद असल्याने पाडा, वस्ती, पालात राहणार्‍या पाल्यांना ना शिकवणी, ना आॅनलाईन व्यवस्था, ना घरात कुणी शिकलेला कि जो थोडफार शिकवेल, ना कुणाकडे मोबाईल, विजच नाही तर टीव्ही कुठुन.

अशा परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा यासाठी आरोग्य ग्राम जखणगांव येथील गणेशवाडी प्राथमिक शाळेत पालक व शाळा व्यवस्थापन समितीची तातडीची बैठक घेण्यात आली.

अर्धवेळ का होईना पण शाळा सुरु करण्यासंबंधी कार्यवाही व्हावी असा ठराव सर्वानुमते यावेळी करण्यात आला.

ग्राम संसद, शाळा व्यवस्थापन तथा कोरोना प्रतिबंधक समितीचे सदस्य डॉ. सुनील गंधे यांच्या पुढाकाराने व प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष अनिल कार्ले यांच्या अध्यक्षतेखाली ही मिटींग सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळुन घेण्यात आली.

शाळेशिवाय शिक्षण नाही, शिक्षणाशिवाय प्रगती नाही हे जरी खरे असले तरी शाळेत जाणाऱ्या मुलांना शाळेत गेल्यामुळे ‘कोरोना’ झाला तर जबाबदारी कुणी घ्यायची अशा भितीने व गैरसमजामुळे, यापेक्षा दुसरा पर्याय नाही का ? असे मत अनेक अडाणी पालकांनी व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post