वेब टीम : मुंबई सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचार्यांना कोरोनाची ल...
वेब टीम : मुंबई
सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंडे यांना उपचारासाठी बीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येत असून, त्यांची प्रकृती उत्तम असून, चिंतेचे कारण नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
धनंजय मुंडे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
त्यामुळे अन्य मंत्र्यांना व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना क्वारंटाईन व्हावे लागण्याची शक्यता आहे.
मात्र, या दोन्ही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते.
तरीही कोणालाही लक्षणे आढळल्यास त्वरित कोरोना चाचणी करण्यात येईल, असेही टोपे यांनी सांगितले.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा यांनी दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह तीन सचिव दर्जाच्या अधिकार्यांना कोरोनाची लागण झाली होती.
आता धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे दोन स्वीय सहायक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक या पाच कर्मचार्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.