भारतविरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला मोदी सरकारचा दणका...


वेब टीम : दिल्ली
सीमारेषेच्या वादावरून भारत-चीन संबंध ताणले गेले असतानाच आता पाकिस्तानसोबतचाही तणाव वाढत आहे.

दररोज पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात भारतीय सैन्यांना लक्ष केले जात आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून दिल्लीतल्या पाकिस्तानी दुतावासातल्या कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याच बरोबर इस्लामाबादमधल्या भारतीय दुतावासातल्या (Indian Ambisi) कर्मचाऱ्यांची संख्याही ५० टक्क्यांनी कमी केली जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच इस्लामाबादमध्य भारतीय दुतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पाठलाग केल्याची घटना समोर आली होती.

त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांना काही तास ताब्यातही घेण्यात आलं होतं.

दिल्लीतल्या पाकिस्तानी दुतावासातले कर्मचारी हे भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेले असल्याचा संशय परराष्ट्रमंत्रालयाने व्यक्त केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post