भाजपचे नेते म्हणतात... मोदींनी जगात वेगळी छाप पाडली...


वेब टीम : मुंबई
कोरोनासारख्या जागतिक महामारीचा सामना करताना अनेक देश हतबल झाले आहेत

पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने भारताला या संकटाचा सामना करण्याचे बळ देऊन आत्मनिर्भर बनवले आहे.

मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ऐतिहासिक निर्णय घेत जगामध्ये आपली एक वेगळी छाप पाडली आहे

असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा घेताना भा.ज.पा. प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी रत्नागिरी येथे केले.

कोरोनाचा प्रभावी मुकाबला, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना आणि देशातील अनेक दशकांच्या समस्या सोडविणारे ऐतिहासिक निर्णय हे या वर्षाचे वैशिष्ट्य आहे, असे ते म्हणाले.

मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी रत्नागिरी शहरात भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन , तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे , शहराध्यक्ष सचिन करमरकर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख राजेश सावंत , सचिन वाहळकर, नगरसेवक उमेश कुळकर्णी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post