चर्चेत राहण्यासाठी संजय राऊत काहीही करतील : प्रवीण दरेकर


वेब टीम : मुंबई 
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर तोफ डागली आहे.

संजय राऊत हे चर्चेत राहण्यासाठी सतत वेगवेगंळ काही तरी करत असतात.

कधी सामातून अग्रलेख लिहितात, मोदींची स्तुती करतात आणि लगेच त्यांच्यावर टिकाही करतात.

त्यामुळे त्यांचा कुणी अंदाजच लावू शकत नाही.

नुकतीच त्यांनी राज्यपालांवर देखील टिका केली होती, पण काही दिवसांनी लगेच राज्यपाल किती चांगले आहे म्हणत त्यांना वाकून नमस्कार करतांनाची छायाचित्र देखील आपण पाहिली आहेत.

त्याचा हा सगळा प्रयत्न राज्यातील कोरोनाचे वाढते रुग्ण, होणारे मृत्यू यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच आहेत.

संकटाच्या काळात एखादी व्यक्ती जर चांगली काम करत असेल तर त्याचे कौतुक झाले पाहिजे,

मग तो कोणत्या जाती-धर्माचा, राजकीय पक्षाचा असला तरी असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अडकलेल्या मजूरांना गावी जाण्यासाठी मदत करणारा अभिनेता सोनू सूद याच्या कामाची प्रचंड चर्चा सुरु आहे.

मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोनू सूदच्या एकूण कार्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सामनातील ‘रोखठोक’ या सदरात संजय राऊत यांनी सोनू सूदला दत्तक घेऊन भाजप नेते उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण करु पाहत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

त्या लेखावरूनच संजय राऊत यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post