राज्यपालांच ज्ञान अर्थातच आपल्यापेक्षा मोठ असेल; पवारांचा टोला...


वेब टीम : मुंबई
कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने मोठे नुकसान केले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकसानग्रस्त कोकण दौरा केला.

दोन दिवस पवारांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.

यावेळी पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असं चित्र असताना, पवारांनी राज्यपालांवर चिमटा काढला.

“राज्यात अनेक शिक्षण संस्था आहेत. कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत.

IIT ने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

जगातील ख्यातनाम अशा ऑक्सफोर्ड विद्यापीठ, अन्य चांगल्या विद्यापीठांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला.

मात्र राज्यपालांचं ज्ञान अर्थात आपल्यापेक्षा मोठं असेल.” असा टोला  शरद पवारांनी लगावला.

अगदीच कोणी काही चुकीचं केलं असा निष्कर्ष काढला असं मला वाटत नाही, असं पवार म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post