शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; पोलिस जखमी


वेब टीम : पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलीस पायलेटिंग गाडीला अपघात झाला असून त्यात एक पोलीस अधिकारी किरकोळ जखमी झाला आहे.

सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना या ताफ्यात मागे असलेली पोलीस पायलेटिंग व्हॅन (क्र. एमएच 12 एन.यु. 5881) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाच्या जवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यात पलटी झाली.

यापूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली शहरच्या हद्दीत ढेकू गावाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार ढेकू गावाजवळ द्रुतगती मार्गावर असलेल्या उतारावर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरने समोर जाणारा ट्रक, मोटारकार व टेम्पो यांना धडक दिल्याने हा अपघात झाला.

या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले होते. याठिकाणी झालेली अपघातांची कोंडी कमी होते न होते तोच लोणावळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमृतांजन पुलाच्या खाली पोलीस व्हॅन पलटी झाली. त्यामुळे सोमवारचा दिवस हा अपघाती दिवस ठरला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post