छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवा, अन्यथा आंदोलन...


वेब टीम : अहमदनगर
अहमदनगर महापालिकेच्या महासभेत आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महापालिकेच्या प्रांगणात बसवण्याबाबतचा ठराव करण्यात आला होता.

याबाबत गेल्या 2 वर्षापासून पाठपुरावा चालू असून देखील अद्यापपर्यंत कार्यवाही झालेले दिसून येत नाही, असे शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी निवेदनात म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचे निवेदन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना माजी गटनेता गणेश शेंडगे आदींनी दिले.

यावेळी शहर अभियंता सुरेश इथापेही उपस्थित होते.


संभाजी कदम पुढे म्हणाले की, महाराजांचा पुतळा बसवण्याची जागा निश्चित असूनही पुढील आवश्यक त्या प्रक्रिया जलद गतीने राबविणे आवश्यक होते.

माजी महापौर सुरेखा कदम यांच्या काळात याकरीता ठराव करून निधीची तरतूद केली होती.

त्यानुसार कार्यवाही झाली असती तर इतक्या दिवसात महाराजांच्या पुतळयाची उभारणी झाली असती

परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे याबाबतची कार्यवाही लवकर होत नाही.

आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा पुतळा नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात बसवण्याची सर्व प्रक्रिया तातडीने राबवावी

अन्यथा आयुक्त दालनात शिवसेना आंदोलन करेल त्यांची सर्व जबाबदारी आपणांवर राहील असा इशारा देण्यात आला.

सदर निवेदनावर संभाजी कदम, गणेश शेंडगे, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, प्रशांत गायकवाड आदींच्या सह्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post