... अन्यथा निम्मा भारत महिनाभरही तग धरू शकणार नाही...


वेब टीम : दिल्ली
देशात गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर केले होते. यावेळी बरेच उद्योगधंदे ठप्प होते.

परंतु आता सरकारने काही प्रमाणात अटी शिथिल करून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

नोकरीशिवाय किंवा कोणत्याही उत्पन्नाच्या स्त्रोताशिवाय भारतीय किती महिने तग धरू शकतात या संदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले होते.

अर्धे भारतीय कोणत्याही नोकरीशिवाय किंवा उत्पन्नाच्या स्त्रोताशिवाय एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी तग धरु शकत नाही.

तर बऱ्याच कालावधीसाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आणि नोकरी गेल्याने आपण किती काळ तग धरू शकतो, अशी चिता अनेकांना असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले.

आयएएनएस आणि सीव्होटरच्या ईकॉनॉमी बॅट्री वेब सर्व्हेनुसार २८.२ टक्के पुरूषांनी आपण कोणत्याही नोकरी अथवा उत्पन्नाच्या स्त्रोताशिवाय एक महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी तग धरू शकत असल्याचे म्हटले.

तर २०.७ टक्के पुरूषांनी ते एका महिन्यापर्यंत तग धरू शकत असल्याचे म्हटले.

तर दुसरीकडे १०.७ टक्के लोकांनी सांगितले की, ते कोणत्याही उत्पन्नाशिवाय एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी तग धरू शकतात.

८.३ टक्के लोकांनी ३ महिने आणि ९.७ टक्के लोकांनी ४ ते ६ महिने आणि ५.७ टक्के लोकांनी एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी तग धरू शकणार असल्याचे म्हटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post