राज्यात पावसाळी अधिवेशनाला ३ ऑगस्टपासून होणार सुरुवात...


वेब टीम : मुंबई
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर आहे.

पावसाळी अधिवेशनाला ३ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना या विषयी माहिती दिली आहे.

परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर २२ तारखेला अधिवेशन घेणे शक्य नाही असे लक्षात आले.

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर ३ ऑगस्टला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुरवण्या मागण्यांसाठी एक दिवसाचे अधिवेशन घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

कोरोनाची साथ सुरू झाल्याने आठवडाभर आधीच राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळले होते.कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पावसाळी अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट होते.

हे अधिवेशन ठरल्याप्रमाणे घ्यायचे की पुढे ढकलायचे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठकही पार पडली होती.

या आधी पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होईल असं जाहीर करण्यात आलं होतं.

पण ३० जूनपर्यंत सर्व रेल्वे आरक्षण रद्द झाल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमदार व त्यांचे कर्मचारी मुंबईत कसे येणार,कोरोनाच्या काळात ही गर्दी करायची का असे प्रश्नही समोर होते.

त्यामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याबाबत विचार सुरू होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post