आयसीसीच्या क्रमवारीत कोहली पहिल्या स्थानावर तर, रोहित शर्मा दुसऱ्या


वेब टीम : मुंबई
भारतीय एकदिवसाच्या संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांनी आयसीसीच्या एकदिवसाच्या क्रमवारीत आपले पहिले आणि दुसरे स्थान कायम राखले आहे. 

तर गोलंदाजांच्या यादीत भारताचा युवा गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसर्‍या स्थानी कायम राहिला आहे. 

आयसीसीने एकदिवसाच्या सामन्यांची क्रमवारी जाहीर केली. या यादीत विराट 871 गुणांसह पहिल्या तर रोहित 855 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.

गोलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा जसप्रीत बुमराह 719 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. 

न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्ट 722 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. 

दरम्यान 30 जुलैपासून आयसीसीच्या बहुचर्चित स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

 भारतात 2023 साली होणार्‍या स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी ही स्पर्धा प्रत्येक संघासाठी महत्वाची आहे.

४ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झालेली असली तरीही डिसेंबर महिन्याखेरीस भारतीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मैदानात उतरताना दिसणार नाहीत. 

त्यामुळे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना मैदानात पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांना थोडी वाट पहावी लागणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post