महाविकास आघाडीत मतमतांतरं असू शकतात मात्र आम्ही ते बसून सोडवतो...


वेब टीम : मुंबई
महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. 

मात्र, महाराष्ट्राला लवकरच कोरोनाच्या  स्थितीतून बाहेर काढू व पाच वर्षांत आम्ही राज्याला विकासाच्या उच्च पातळीवर घेऊन जाऊ, असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. 

ते म्हणाले, आमचं सरकार आलं आणि कोरोनाचं संकट आलं.

मात्र आम्ही पाच वर्षांत राज्याला विकासाच्या उच्च पातळीवर घेऊन जाऊ. काँग्रेस हा पक्ष इतर पक्षापेक्षा वेगळा आहे. 

आमच्या पक्षात लोक बोलू शकतात, तक्रारदेखील करू शकतात, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले. 

ते एबीपी माझाच्या व्हिजन महाराष्ट्र कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारमधील अंतर्गत प्रश्नांवरदेखील भाष्य केले. 

महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्विरोध नाही.

आम्ही एकत्र आहोत, मतमतांतरं असू शकतात मात्र आम्ही ते बसून सोडवतो. सर्व समस्या आम्ही एकजुटीनेच सोडवणार आहोत. 

तसेच, मुख्यमंत्र्यांना बाकीचे मंत्री भेटणं ही साधारण गोष्ट असते. त्यावर माध्यमं वेगळा रंग दाखवतात. लहान गोष्टींना विनाकारण मोठं केलं जातं. 

सरकार तीन पक्षांचं असो वा एका पक्षाचं. एका पक्षाचं सरकार असलं तरी सरकारमध्ये नाराजी असतेच. 

आम्ही एकत्र पद्धतीनेच यापुढे काम करणार आहोत, असंही थोरात म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post