महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती स्वीकारावी का? गौतम गंभीर म्हणतो...


वेब टीम : मुंबई
इंग्लंडमध्ये २०१९ साली आयोजित विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. 

या स्पर्धेनंतर भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाबाहेर आहे. 

संपूर्ण स्पर्धेत धोनीची संथ फलंदाजी हा चर्चेचा विषय ठरली होती. यानंतर सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीबद्दलची चर्चाही रंगली होती. 

परंतू धोनीने अद्याप निवृत्तीबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. आयपीएलच्या तेराव्या हंगामातून धोनी क्रिकेटच्या मैदानावर पदार्पण करणार आहे. 

अनेक माजी खेळाडूंनी धोनीने आता निवृत्त व्हावे असा सल्ला दिला होता. 

परंतू भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरच्या मते धोनी जर शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल तर तो भारतीय संघासाठी खेळू शकतो. 

माझ्यामते वय हा एक आकडा आहे. जर धोनी चांगल्या फॉर्मात असेल आणि आधीसारखीच फलंदाजी करत असेल तर तो भारतीय संघाकडून नक्कीच खेळू शकतो. 

माझ्या मते त्याने भारतीय संघासाठी खेळत रहावं कारण त्याला कोणीही निवृत्तीसाठी दबाव टाकणार नाही. 

भारतीय संघात सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी धोनी अजुनही उपयुक्त ठरु शकतो. 

ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात करता त्यावेळी तो तुमचा निर्णय असतो. 

त्याचप्रमाणे निवृत्तीचा निर्णयही तुमचाच असला पाहिजे. यासाठी कोणत्याही खेळाडूवर दबाव टाकता येत नाही असे गंभीरने सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post