राम मंदिर भूमिपूजनासाठी आता कोरोना संकटाची वेळ योग्य नाही...


वेब टीम : मुंबई
राममंदिर भूमिपूजन होत आहे हे अभिमानास्पद आहे. 

मात्र, भूमिपूजनासाठी आता कोरोना संकटाची वेळ योग्य नाही. 

भूमिपूजनासाठी आताची वेळ का ठरवली असा प्रश्नदेखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

ते म्हणाले, कारण आता लोकांमध्ये कोरोनाचे भय आहे. 

कोरोनातून लोक अजून बाहेर पडलेले नाहीत त्यामुळे एक दिवसाचं भूमिपूजन होईल, बातम्या येतील, चर्चा होईल एवढंच.

मुख्यमंत्री, उद्धव ठाकेर यांनी ई पूजन व्हावे असे म्हटले होते. 

त्यावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली ते म्हणाले, राम मंदिराचं भूमिपूजन धघुमधडाक्यातच व्हायला हवं. 

ई -पूजन वगैरे नाहीच.

ठाकरे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात ते बोलत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post