सततचं लॉकडाऊन राज्यासाठी चांगले नाही : राज ठाकरे


वेब टीम : मुंबई
कोरोनाच्या स्थितीवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी सत्ताधारी ठाकरे सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. 

सतत लॉकडाऊनमध्ये राहणं राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका, परप्रातीय कामगार, अनलॉक, भूमिपूजन, सोनु सूद या सर्व विषयांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी परखड शब्दांत आपले मत मांडले. 

ते एबीपी माझा च्या व्हिजन महाराष्ट्रमध्ये बोलत होते.


ते म्हणाले, कोरोनाबाबत काळजी घेणं महत्त्वाचं आहे, मात्र घाबरत राहून घरी राहणं योग्य नाही.

लोकांना आता मोकळीक देणं भीती जाणं महत्त्वाचं आहे. अनलॉकमुळे सगळ्याच गोष्टी अजूनही सुरू झालेल्या नाहीत.

सगळ्या गोष्टी पुर्ववत सुरू करायला हव्यात. सतत लॉकडाऊनमध्ये राहणं राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही. 

मनसेची माणसं सतत सरकारच्या अनागोंदी कारभारावर बोलत आहेत. 

सरकारनं ज्या गोष्टी करायला हव्यात त्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीत अशी संतप्त भावना राज ठाकरे यांनी बोलून दाखवली. 

तसेच, गर्दी टाळण्यासाठी बाहेर गेलो नाही अशी कबुलीही राज ठाकरे यांनी दिली. 

मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त टीव्हीवर दिसले कारभार दिससला नाही अशा शब्दांत राज यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post