केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रुग्णालयात दाखल...


वेब टीम : दिल्ली
देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. 

आता केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित  शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात  शहा  यांनीच ट्विटरद्वारे माहिती दिली.

“कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने मी माझी चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

माझी तब्येत ठीक आहे; पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. 

मी आवाहन करतो, तुमच्यापैकी जो कोणी गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आला असेल, 

त्यांनी कृपया स्वत: विलगीकरणात राहावे आणि आपली चाचणी करून घ्यावी.” असे आवाहन अमित  शहा यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post