वेब टीम : सातारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील कोविड वॉर्डची पाहणी करून नर्सेस व डॉक्टर यांच्याशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.
त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड 19 ची नेमकी माहिती घेतली. त्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
साताऱ्याचे राज्यसभेतील खासदार छत्रपती उदयनराजे कुठे आहेत, असे विचारल्यावर श्री फडणवीस यांनी त्यांचा माझा फोन झाला आहे.
त्यांना थोडी कणकणी असल्याने ते आलेले नाहीत, असे त्यानी सांगितले.
साताऱ्यातील कोरोनाची परिस्थिती खूपच गंभीर आहे.येथील संख्या वाढली असून बेड कमी पडत आहेत.
त्यामुळे शासनाने जिल्हा प्रशासनाने पाठविलेला स्टेडियम मधील हॉस्पिटलचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा.
मी त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. तसेच कोरोना चाचणी आणखी वाढविणे आवश्यक आहे.
400 बेडचा प्रस्ताव प्रलंबित राहणे सध्याच्या परिस्थितीत योग्य नाही.
केंद्र शासनाने लाॅकडाऊन शिथिल करताना धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी दिली आहे.
त्यानुसार सर्व राज्यांनी धार्मिक स्थळे खुली केली आहेत. पण महाराष्ट्रातच नाहीत.
दारूची दुकाने व मॉल सुरू करता मग मंदिरे सुरू करण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.