FriendshipDay : इस्रायलचे ट्विट... 'तेरे जैसा यार कहाँ...


वेब टीम : दिल्ली
इस्रायल आणि भारताची मैत्री जुनी आहे. कठीण प्रसंगात या मैत्रीचे पुरावे मिळतात. 

आज (रविवारी) जागतिक मैत्रीदिनानिमित्त इस्रायलच्या दूतावासाच्या ट्विटर हँडलवरून भारताला पाठवलेल्या संदेशात इस्रायलने ‘याराना’ चित्रपटातील ‘तेरे जैसा यार कहाँ’ या गीताची धून वापरली. 

या व्हिडीओतून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील दृढ मैत्रीही दिसून येत आहे. ‘तेरे जैसा यार कहाँ’च्या धूनचा वापर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. 

इस्रायलने ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या भेटीची झलक आहे. तसेच कोरोनाच्या जागतिक संकटाशी एकत्रित मुकाबला करण्याचा संकल्पही आहे.

नेतान्याहू आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील दृढ मैत्री जगजाहीर आहे. पंतप्रधान मोदी यांच्या इस्रायल दौर्‍यावेळी नेतान्याहू प्रोटोकॉल तोडत मोदी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते. 

इस्रायलमध्ये असे स्वागत याआधी फक्त अमेरिकेचे अध्यक्ष आणि पोप यांचे करण्यात आले होते. नेतान्याहू आणि पंतप्रधान मोदी यांची मैत्री जुनी आहे. 

दहशतवादाविरोधातील लढाईत इस्रायल नेहमी भारतासोबत आहे. इस्रायल आणि भारतानेकोरोना जागतिक संकटाविरोधात एकत्रित लढण्याचा संकल्प केला आहे. 

भारताने इस्रायलला ‘हायड्रोक्लोरोक्विन’ पाठवले तेव्हा नेतान्याहू यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post